Akhil Maharashtra Lohar Gadi Lohar Samaj Vikas Mahasangh

Maharashtra Lohar Gadi Lohar Samaj Website

Akhil Maharashtra Gadi Lohar Samaj Vikas Mahasangh
फेसबुक
येण्याची नोंद
प्रतिक्रिया कळवा
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी
Image
श्री. दिलीप अनंता थोरात
संकल्पना, संकलन, सदस्य महासंघ
८०८७६२८९६३
M.A(Socio.),M.Lib & I.Sc. Journalist
Image
श्री. सुभाष कारंडे
महासचिव
९८९०३३३१०३
Image
श्री. चंद्रकांत गोविंद लोहार (नन्नवरे)
सदस्य, महासंघ
९४२३७७५०५०
Image
श्री. भानुदास पारोळेकर
सदस्य, महासंघ
धुळे जिल्हा अध्यक्ष
९५६१४४८२५९
Image
डॉ. धनंजय पवाळकर
सदस्य, महासंघ
९९२२५२१६६७
Image
श्री. मुरलीधर टिंगरे
सदस्य, महासंघ
Image
मा. श्री. द. रा. सम्राट
निवृत्त न्यायाधीश,
कायदेशीर सल्लागार,
०२०-२७६५७९३५
पुणे जिल्हा कार्यकारिणी
Image
श्री. दिलीप अनंता थोरात
अध्यक्ष
८०८७६२८९६३
Image
श्री. नाथा नारायण थोरात
सचिव, पुणे जिल्हा
९२२५९५००७४
Image
श्री. संदीप ज्ञा. थोरात
अध्यक्ष, हवेली तालुका
९२७००८२९४६
Image
श्री. तात्यासाहेब भा. लोखंडे
कार्याध्यक्ष पुणे जिल्हा
९४०३३५७५१८
Image
श्री. उमेश शंकरराव चव्हाण
अध्यक्ष पुरंदर तालुका
९४२०४२३८९३
Image
श्री. किरण ना. थोरात
सचिव, पुरंदर तालुका
९४२०१६६९१७
Image
श्री. मधुकर लोखंडे
अध्यक्ष
खेड-आंबेगाव-जुन्नर तालुका शाखा
९९६०८५१८९२
Image
सौ. पारू बबन लोहार
सचिव, मंचर ता. अंबेगाव जि. पुणे
९४२३५६८१००
Image
श्री. विश्वनाथ लोखंडे
कार्याध्यक्ष
खेड-आंबेगाव-जुन्नर तालुका शाखा
९८६०६३२१४१
Image
सौ. हिराबाई थोरात
सामाजिक कार्यकर्त्या
९८२२३९६४५६
संस्थेची उद्दिष्टे
 • १) महाराष्ट्रातील लोहार, गाडी-लोहार समाजाचा आर्थिक विकास साधण्यास सहाय्य करणे. उदा.
  • अ) आर्थिक मदतीसाठी शासनाच्या योजनांची माहिती पुरविणे व त्यासाठी जिल्हावार व तालुकावार मार्गदर्शन केंद्र चालविणे, इ.
 • २) महाराष्ट्रातील लोहार, गाडी-लोहार समाजाचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी भरीव प्रयत्न करणे.
  • अ) शिष्यवृत्त्या \ शासकीय सवलती यांची माहिती पुरविणे.
  • ब) तांत्रिक शाळा \ तंत्रनिकेतन उघडणे व चालविणे.
  • क) वसतिगृह स्थापन करून ते चालविण्यासाठी व त्यासाठी आवश्यक शासकीय सवलती मिळविणे, वसतीगृह चालविण्यास जिल्हा संघटनेस मदत करणे.
  • ड) राज्यात विविध ठिकाणी आश्रमशाळा उघडणे.
  • इ) मुलींच्या शिक्षणाबाबत योजना आखणे.
  • फ) हुशार मुला-मुलींची शिक्षण व्यवस्था करणे. बक्षिसे देण्याची अथवा प्रोत्साहनपर शिष्यवृत्या देण्याची योजना आखणे.
 • ३) महाराष्ट्रातील लोहार, गाडी-लोहार समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास साधने.
  • अ) महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या सामाजिक अडीअडचणी सोडवण्यास पुढाकार घेऊन त्यांना आवश्य ते साहाय्य करणे.
  • ब) अनिष्ठ चालीरीती, अंधश्रद्धा, उत्सव-समारंभ, विवाह याबाबत संस्कार क्षमता व सामंजस्य निर्माण करून त्यामध्ये साधेपणा आणण्याच्या कामी, परस्परांमध्ये स्नेह सामंजस्य निर्माण करून संघर्ष व स्पर्धा टाळण्याच्या कामी कार्यक्रम राबविणे.
वार्षिक नियोजन

अखिल महाराष्ट्र लोहार समाज विकास महासंघ, साताराचे शाखा पुणे जिल्ह्याचे संघटन करण्याच्या कार्यात बराच काळानंतर जिल्हा कार्यकारिणी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. आपण सर्वजण मिळून कोणताही मनात किंतु न ठेवता पुणे जिल्हा महाराष्ट्रात नंबर एक करुया. आम्ही अनुभवावरून सांगतो की, आपल्या सर्वांमध्ये मोठी ताकद आहे. ती फक्त विभागली गेली असून ती एकत्र यायला हवी. आम्हाला विश्वास वाटतो की आपण आम्हा जिल्हा कार्यकारिणीला साथ देऊन सातत्याने संघटन कार्यात भाग घेऊन महासंघाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवून महासंघाचे कार्य वाढण्यास नियमितपणे कार्यरत राहाल हि अपेक्षा.

आम्ही पुणे जिल्हा कार्यकारिणी आपणासमोर प्रत्येक वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन यादी ठेवत आहोत.:

 • पुणे जिल्ह्याचे लोहार समाजाचे तालुकावर संघटन करणे.
 • महासंघाचे नामफलक गावांनुसार, तालुकानुसार जिल्ह्यामध्ये लावणे.
 • कार्यक्षम कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना संघटनेत सहभागी करणे.
 • प्रत्येक तालुक्यातील कार्यकारिणीतील तीन सभासदांस जिल्ह्यावर घेणे, कार्यकर्त्यांची टीम तयार करणे.
 • लोहार समाजाचा सर्व्हे करणे, याकरिता सभासद नोंदणी अभियान राबविणे. यासाठी सभासदाकडून सर्व्हे फॉर्म भरून घेणे.
 • प्रत्येक वर्षी माहे ऑक्टोबर आणि एप्रिल मध्ये वधुवर मेळावा आयोजित करणे. कालांतराने सामुदायिक विवाह सोहोळे आयोजित करणे. संकलित वधूवरांची माहिती प्रसिद्ध करणे आणि गरजूंना देणे.
 • प्रत्येक वर्षी माहे ऑक्टोबर मध्ये गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांना समाज रत्न, समाज विभूषण, समाज भूषण आणि समाज गौरव पुरस्कार देणे.
 • श्री विश्वकर्मा लोहार धर्मशाळा आळंदी देवाची येथे अद्ययावत लोहार समाज सांस्कृतिक भवन बांधणेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
 • लोहार समाजाची सामाजिक, शैक्षणिक व इतर महत्वाची माहिती संकलित करून समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लोहाकांत मासिक सुरु करणे.
 • पुणे जिल्हा लोहार समाजाची मासिक सभा महिन्याच्या शेवटच्या रविवारी आळंदी धर्मशाळा येथे दु. १२ वा. असते. कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे व कार्याबाबत सूचना कराव्यात.

मित्रांनो वरील काम सुस्थितीत होनेकारिता आपले सहकार्य आणि आर्थिक मदत लागणार आहे. याकरिता आम्ही आपणाकडे वर्षातून एकदा रु. १००/- सभासद देणगी रुपाने मागत आहोत. याची आम्ही पावती देणार आहोत आणि दरवर्षी छापील जमाखर्चाचा अहवाल सुद्धा देणार आहोत. आपल्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहन द्याल, आणि नेहमी सहकार्य कराल अशी आशा बाळगतो.

पान क्र.
उपक्रम २०१४
वधू - वर मेळावा (दि. १७/०८/२०१४)
कै. स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ नामदेव पोपळघट (लोहार मास्तर) राहुरी यांच्या स्मरणार्थ - दि. १७/०८/२०१४ - . या मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
उपक्रम २०१३
वधू - वर मेळावा (दि. ०१/०९/२०१३)
कै. समाज महर्षि स्वातंत्र्य सैनिक हौशीनाथ लोहार (पोपळघट) यांच्या स्मरणार्थ - दि. ०१/०९/२०१३ - . या मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
उपक्रम २०१२
वधू - वर मेळावा (दि. ०१/०७/२०१२)
रविवार दि. ०१/०७/२०१२ रोजी डॉ. आंबेडकर भवन येथे वधू - वर सूचक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
उपक्रम २००९
वधू - वर मेळावा (दि. २५/०४/२००९)
शनिवार दि. २५/०४/२००९ रोजी डॉ. आंबेडकर भवन येथे वधू - वर सूचक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून १२५ वधू वर व त्यांचे पालक उपस्थित होते. त्याचे रीतसर अर्ज कार्यालयात पहावयास मिळतील.
वधू - वर मेळावा (दि. ०४/१०/२००९)
रविवार दि. ०४/१०/२००९ रोजी डॉ. आंबेडकर भवन येथे वधू - वर सूचक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून ११५ वधू वर व त्यांचे पालक उपस्थित होते. त्याचे रीतसर अर्ज कार्यालयात पहावयास मिळतील.

रेणके आयोग (दि. ११/०६/२००८)
मा. रेणके आयोगाचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण रेणके यांची महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जाऊन भेट घेतली व लोहार समाजाच्या समस्ये विषयी चर्चा केली व त्यांना लेखी निवेदन देऊन आयोगाच्या अहवालासंबंधी पाठींबा व्यक्त केला.

अग्रवाल आयोग (दि. २७/०७/२००९) पुणे
मा. अग्रवाल आयोगाचे अध्यक्ष श्री. अशोक अग्रवाल यांची महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे भेट घेतली. लोहार समाजाचा केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या (S.T.) यादीत समावेश करण्यासाठी लोहार समाजाच्या चालीरीती, रुढी परंपरा, सामाजिक, शैक्षणिक समस्यांची चर्चा केली व केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या (S.T.) यादीमध्ये लोहार समाजाचा समावेश करावा अशी शिफारस अग्रवाल आयोगाने केंद्र शासनाला करावी याकरिता महासंघाने लेखी विनंती केली.

उपक्रम २००९
१) लोहार समाजातील विशेष असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस "समाजरत्न पुरस्कार" महासंघाकडून देण्यात येतो. सदरचा पुरस्कार हा प्रत्येक वर्षी एकाच व्यक्तीला देण्यात येतो.

समाजरत्न पुरस्कारीत व्यक्ती जिल्हाधिकारी, श्री. भारत जगन्नाथ सासणे (भा.प्र.से.) बीड जिल्हाधिकारी, यांना ०४/१०/२००९ रोजी लोहार समाजाकडून प्रथम "समाजरत्न पुरस्काराने" गौरविण्यात आले.

२) UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी उमेदवारांना, खेळाडूंना तसेच सामाजिक क्षेत्रातील कामगार, सरकारी किंवा खाजगी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढती व इतर क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना "समाज भूषण पुरस्कार" देण्यात येतो.

दि. ०४/१०/२००९ रोजी पुणे येथील मेळाव्यातील "समाजभूषण" पुरस्कारीत व्यक्तींची यादी:
MPSC परीक्षेमधील यशस्वी व्यक्ती-
१) श्री. संतोष अशोक हराळे, DY. CEO २) श्रीमती ज्योती भारत पोपळघट, DY. Collector

३) दरवर्षी माहे ऑक्टोबर मध्ये इ. १०वी, १२वी व पदवी परीक्षांमध्ये पास झालेल्या मुला मुलींना "समाज गोरव पुरस्कार" देण्यात येतो. ७०% पर्यंत गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल्स देण्यात येतात.

दि. ०४/१०/२००९ रोजी पुणे येथील मेळाव्यातील "समाज गौरव" पुरस्कारीत विद्यार्थ्यांची यादी:
१) देवेंद्र विश्वास लाड, औरंगाबाद बोर्ड ९४.१५%
२) विशाल सुनील हरेल, पुणे बोर्ड ९३.००%
३) पवनकुमार एकनाथ थोरात ८९.८४%

उपक्रम २०१४
वधू - वर मेळावा (दि. २८/१२/२०१४)
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे अखिल महाराष्ट्र लोहार - गाडी लोहार समाज विकास महासंघ, शाखा पुणे आयोजित (दि. २८/१२/२०१४) मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
वधू - वर मेळावा (दि. १७/०८/२०१४)
कै. स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ नामदेव पोपळघट (लोहार मास्तर) राहुरी यांच्या स्मरणार्थ - दि. १७/०८/२०१४ - . या मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
उपक्रम २०१३
वधू - वर मेळावा (दि. ०१/०९/२०१३)
कै. समाज महर्षि स्वातंत्र्य सैनिक हौशीनाथ लोहार (पोपळघट) यांच्या स्मरणार्थ - दि. ०१/०९/२०१३ - . या मेळाव्यातील वधू वरांची यादी खालील प्रमाणे:
संपर्क
अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ, सातारा
रजि. महा. ११२४/८७/एफ/११११/८७/सातारा
शाखा - पुणे जिल्हा कार्यालय: १२७८, कसबा पेठ, कुंभार वाड्याजवळ, पुणे - ११.
फोन: ९४२३२०६३८६ / ८०८७६२८९६३ / ८०८७६२८९६४

संपर्क: सौ. प्रतिमा दिलीप थोरात - ९४२३२०६३८६
shrilohakant@loharsamaj.com
ms.shrilohakant@rediffmail.com

: नाथू थोरात - ९२२५९५००७४
nathu_lohar@rediffmail.com


मराठी शब्द English मधून टाईप करा आणि मराठी मध्ये दिसण्यासाठी SPACE कळ दाबा. English मध्ये टाईप करण्यासाठी CTRL+G दाबा.

Type a word in English and press SPACE to transliterate. Press CTRL+G (⌘+G on Mac) to switch between English and Marathi.